Kolhapur Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागरांवर गुन्हा दाखल करा, Ambadas Danve यांची मागणी
Kolhapur Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागरांवर गुन्हा दाखल करा, Ambadas Danve यांची मागणी
कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र वरपेंचा वाद पुन्हा उफाळून आलाय.. काही दिवसांपूर्वी राजेश क्षीरसागर यांनी सोसायटीच्या वादातून राजेंद्र वरपेंना मारहाण केल्याची घटना घडली होती..मात्र, या प्रकरणी अद्यापही क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने राजेंद्र वरपे यांनी अंबादास दानवे यांच्या कोल्हापूरातील जनता दरबारात दाद मागितली. वरपे यांचे म्हणणे एकून घेत दानवे यांनी तातडीने पोलीस अधीक्षकांना राजेश क्षीरसागरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली... त्यानंतर आपण स्वतः वरपे यांच्या घरी भेट देणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले...तर शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत दानवे यांचे चांगलेच स्वागत केलं जाईल असं क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे... क्षीरसागर यांच्या सोसायटीखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेत. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी