Kolhapur : कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी छापेमारी, आरोग्य विभागानं केलं स्टिंग ऑपरेशन
Continues below advertisement
कोल्हापुरात राजारामपुरी इथल्या श्री हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि पोलिसांनी हॉस्पिटलवर धडक छापे टाकले.. आरोग्य विभागाने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी रोख पंधरा हजार रुपये स्वीकारताना रुग्णालय व्यवस्थापनाला पकडण्यात आले.. मात्र हॉस्पिटल मधील सोनोग्राफी मशीन बंदअसून मी फक्त पेशंटच्या समाधानासाठी सोनोग्राफी मशीनचे प्रोब फिरवला जात असे हॉस्पिटलमध्ये कोणतेही गर्भलिंग निदान होत नाही असा दावा हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आलाय.
Continues below advertisement