Kolhapur Rajaram Sugar Factory Election : कोल्हापूर राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी
कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होणार आहे...विरोधी आघाडीचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी आपली मोट बांधतेय.. त्यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून राजाराम साखर कारखान्याॉच्या निवडणुकीकडे पाहिलं जातंय.