Kolhapur मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीवरुन उडी मारताना एकाचा मृत्यू : ABP Majha
कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी येतेय.. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दोघांनी इमारतीवरून उडी मारली, यात एकाचा जागीच मृत्यू झाला. साहिल मानकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यात साहिलचं डोकं दगडावर आपटल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.