Kolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणी

Continues below advertisement

 कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथील मनचरियाल याठिकाणी अटक केली मनचरियाल रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्याच वास्तव्य होतं कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरसाठी रवाना झालं आहे चंद्रपूर येथे काही दिवस वास्तव्यास होता  एक महिन्यामध्ये कोरटकरला कुणी कुणी मदत केली त्या सगळ्यांचा तपास होणार उद्या सकाळी प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस कोल्हापूरात येणार  तेलंगणावरून कोल्हापूरच्या दिशेने रवाना उद्या कोल्हापूरात येताच कोरटकरला न्यायालयात हजर करणार  दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी तेलंगणा राज्यातल्या मंचरियाल इथून कोरटकरला घेतले ताब्यात उद्या सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कोल्हापूरात येणार काही टोल नाके, हॉटेल सीसीटीव्ही तपासले  आरोपीने कुठे कुठे वास्तव्य केले याबाबत चौकशीत माहिती समोर येईल त्याला कोणी आश्रय दिला असेल त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल पोलिसांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्नच नव्हता  आम्हीच हायकोर्टात गेलो होतो जामीन फेटाळला जावा यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे पोलीस अधिकारी त्याच्या संपर्कात होते यात काहीही तथ्य नाही  मुख्यमंत्री यांचे पहिल्या दिवशीपासून आदेश होते, कोणत्याही महापुरुषांच्याबद्दल कोणी बदनामीकारक बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी  कोरटकर याला ताब्यात घेतले आहे याबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे  ---------------------  कोरटकरला त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी 2:45 वाजता ताब्यात घेतले  तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले जाईल.  प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  त्यामुळे त्याला तिथे आणले जाईल. प्रशांत कोरटकरला उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola