Kolhapur Village : कोल्हापूरच्या बुजवडे गावात वृद्धाला झोळीतून उपचारासाठी नेण्याची वेळ

Continues below advertisement

कोल्हापुरच्या बुजवडे गावातील धनगर वाड्यावर राहणाऱ्या ९० वर्षाच्या वृद्ध रुग्णाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आलीय. या धनगरवाड्याला गावात येण्यासाठी साधा पक्का रस्ता नाहीये.. त्यामुळे जंगलातून गावात येण्यासाठी ५ किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. तसंच दुर्गम भाग असल्याने डॉक्टरही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रस्ता तयार करुन देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram