Kolhapur Nitesh Rane Full Speech : आमची पद्धत एकच, फक्त कपडे वेगळे आहेत : नितेश राणे : ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापुरात लव्ह जिहाद आणि धर्मांतर असे प्रकार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आज या प्रकरणी मोर्चा काढला होता. हिंदू मुलींकडे पाहिल्यास डोळे काढू असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिला. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार घडल्यानं हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप राणे यांनी केलाय. पळवून नेलेली मुलगी तात्काळ परत आली नाही तर कोल्हापुरात तांडव होईल असा इशारा राणे यांनी दिला. डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणावा अशी मागणी राणे यांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram