Kolhapur Black Magic Case : करणी केल्याच्या संशयावरुन शेजाऱ्याचा खून, निखिल गवळी पोलिसांसमोर शरण
Continues below advertisement
कुटुंबावर करणी करत असल्याच्या संशयावरून टेंबलाई नाका येथील निखिल गवळी याने शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर घरात घुसून हल्ला केला... या हल्ल्यात आझाद मुलतानी हे जागीच ठार झाले तर घरातील एक महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे... कोल्हापुरातील टंबलाई नाका परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे... यानंतर हल्लेखोर निखिल गवळी हा स्वतःहून राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला... मुलतानी कुटुंब हे करणी करत असल्याचा संशय हल्लेखोर निखिल गवळी याला होता... याच रागातून त्यांनी आझाद मुलतानी यांची हत्या केली... मुलतानी कुटुंब जेवत असतानाच हल्ला केल्याने जेवणाची ताटे आणि रक्ताचा सडा एकत्रच पाहायला मिळाला....
Continues below advertisement