Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी आक्रमक, नेमकं कारण काय? पालकमंत्री Deepak Kesarkar EXCLUSIVE

Kolhapur News: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची (Kolhapur Bandh) हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. 

मटण मार्केटमध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर शहरामध्ये रॅली काढण्यावर ठाम आहेत. मात्र त्याला कोल्हापूर पोलिसांनी विरोध करत तुम्हाला या ठिकाणी जितक्या वेळ आंदोलन करायचं ते करा, असे आवाहन करत रॅलीला परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच संपूर्ण शहरात अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाजी चौक परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola