Kolhapur : कोल्हापुरात खड्ड्यांमुळे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आईचं निधन, प्रशानसाचं दुर्लक्ष
abp majha web team
Updated at:
28 Oct 2022 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर महानगरपालिकामधील कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. कोल्हापूर महापालिकेमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आईचा रस्त्यांवरील खड्डयांमुळे मृत्यू झाला आहे. मात्र तरी देखील निरढावलेल्या अधिकाऱ्यांना याचे काहीही वाटत नाही. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या घरात दुःखद घटना होऊनही पालिकेचे अधिकारी रस्त्यावरचे खड्डे बुजवत नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी.