कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे.. त्यामुळे आज या स्पर्धेला बृजभूषण सिंह हजेरी लावणार आहेत... मात्र कोल्हापुरातील विविध संघटनांच्या महिला बृजभूषण सिंह यांना विरोध करणार आहेत.. बृजभूषण सिंह यांच्यावर खेळाडूंचं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला कुस्तीच्या पंढरीत येऊ देणार नाही. अशी भूमिका महिलांनी केलीये..