Kolhapur Hindu Morcha : कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, छ. शिवाजी चौकात ठिय्या
कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस लावल्याचे समोर आलं. यावरून कोल्हापूर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. कोल्हापूरच्या छत्रपती महाराज चौकात आज हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला आहे, तसंच शहरात बंदची देखील हाक देण्यात आली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत.