Kolhapur Gokul : कोल्हापुरात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभे अभूतपूर्व गोंधळ
कोल्हापुरात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. बसण्यासाठी जागा नसल्याने आणि समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याने शौमिका महाडिक सभेतून बाहेर पडल्या आणि समांतर सभा सुरु केली. यावेळी त्यांनी साध्या दूध उत्पादकांची फसवणूक करु नका असं आवाहन करत सत्ताधाऱ्यांनी दिलेली वचनं पाळली नाहीत असा आरोप केला. तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही पलटवार केला.