Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha : गोकुळची सभा वादळी होणार? शौमिका महाडिकांची समांतर सभा होणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली आहे. गोकुळची सभा आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलं असतं. प्रत्येकवर्षी गोकुळची सभा वादळी होत असते.त्यामुळं गोकुळची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळावीत अशी मागणी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शौमिका महाडिक यांच्याकडून समांतर सभा घेतली जाणार आहे. तर गोकुळ दूध संघाचे हित डोळ्यांसमोर ठेवून सर्वसाधारण सभा पार पाडावी असं आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलं आहे.