Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha : संचालिका शौमिका महाडिकांची समांतर सभा होणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली आहे. गोकुळची सभा आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलं असतं. प्रत्येकवर्षी गोकुळची सभा वादळी होत असते.त्यामुळं गोकुळची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. बैठकीच्या निमित्तानं आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटातील वातावरण तापलंय. गोकुळच्या सभेआधी महाडिक गटानं सभेच्या परिसरात पोस्टरबाजी केली आहे. उत्तर द्या म्हणत महाडिक गटानं गोकुळ दूधसंघाच्या कारभाऱ्यांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.