Kolhapur Gadhinglaj : दीपावलीनिमित्त गडहिंग्लजमध्ये एकापेक्षा एक भव्य दिव्य किल्ल्यांची निर्मिती
दीपावलीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी फाऊंडेशन आणि माझं गडहिंग्लज या ग्रूपच्या वतीने गडकिल्ल्यांची स्पर्धा राबवण्यात आली... या स्पर्धेत शहरातल्या तब्बल ३९ मंडळांनी भाग घेतला... आणि एकापेक्षा एक भव्य दिव्य किल्ल्यांची निर्मिती केली... त्यातला एक किल्ला तर एक मजली घराच्या आकाराचा होता.. हे किल्ले पाहण्यासाठी गडहिंग्लजकरांनी गर्दी केली होती...मुलांमध्ये शिवप्रेम जागृत करण्यासाठी दर वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मानस हिरण्यकेशी फाऊंडेशनचा आहे...