Keshavrao Bhosale Natyagruha Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाला आग, कलाकारांच्या अश्रूंचा बांध फुटला

Continues below advertisement

Kolhapur : कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागलीये. अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. आज रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली. हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली. केशराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळ जवळच असल्याने हीच आग पुढे नाट्यगृहात शिरली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

खुर्च्या नाट्यगृहांच्या सर्व खुर्च्या जळून खाक

या आगी नंतर परिसरात खळबळ उडाली

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

आगीच्या प्रचंड ज्वाळांनी थिएटरचे मोठे नुकसान झाले. रंगमंचावर पर्यत आग पसरली आहे. यामुळे थिटएर नामशेष झाला असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती. शाहू महाराज यांच्या कालावधीत पॅलेस थिएटर म्हटले जाई. शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. थिएटरला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जात आहे. आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरु नव्हता. मात्र, रात्री पाऊने दहाच्या आसपास या आगीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला खासमैदानावरील लाकडी स्टेजला लागलेली आग पाहाता पाहता, केशवराव भोसले नाट्यगृहात शिरलेली पाहायला मिळाली. केशवराव भोसले नाट्यगृहावर कोट्यवधींचा खर्च देखील करण्यात आलाय. नाट्यगृहाला डेकोरेशनही करण्यात आले होते. शिवाय इमारतीचे नुतनीकरणही करण्यात आले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram