Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात 19 तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 19 तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह स्टेस्टस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटनेची आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोलिसांच्या आवाहनानंतरही हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं जमावबंदीचे आदेश काढले आहेत.