Kolhapur : कोल्हापुरात 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदी, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध
महाविकास आघाडीच्या कर्नाटकविरोधी आंदोलन आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रशासनानं बंदी घातलेय. आजपासून २३ डिसेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. उद्या महाविकास आघाडीनं कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन केलंय. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून ही जमावबंदी लागू केली आहे.