Old Pension Scheme : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय, मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांचा संप
Old Pension Scheme : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय, मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांचा संप जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात झालीय. आज रात्री बारा वाजल्यापासून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील आणि शासकीय मुद्रणालयामधील कर्मचारी संपावर गेले आहेत. मागणी मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तसंच संप काळात रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही, असं महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी समन्वय समितीने म्हटलं.