Shahu Maharaj on Lok Sabha : मी याआधी लोकसभेसाठी इच्छूक होतो : शाहू महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार शाहू महाराज यांना २०२४च्या लोकसभेचा निवडणुकीत कोल्हापुरातून तिकीट मिळणार का, याबाबत चर्चांना आता जोर आला आहे. 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज यांनी स्वीकारलं आहे. आता २०२४ साली त्यांना उमेदवारी मिळते का, तसा विचार शरद पवारांच्या मनात आहे का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.