Kolhapur Balu Mama : बाळूमामा देवस्थानमध्ये जोरदार हाणामारी, पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता

राज्यभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलंय.. बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा  गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला... या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळालं... बाळूमामा मंदिराच्या ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याचा आरोप करत अदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारे दाखल केली.. यासंदर्भात गुरव हे वकिलांची भेट घेण्यासाठी आपल्या
समर्थकांसोबत कोल्हापुरात आले होते..त्याचवेळी ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले समर्थकांत जोरदार हाणामारी झाली.. दरम्यान या घटनेनंतर आज सकाळी 10 वाजता आदमापूर येथे बाळूमामाच्या मंदिरामध्ये नवीन विश्वस्तांची नेमणूक केली जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजही गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola