कोल्हापूरच्या आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या विश्वस्त आणि कार्याध्यक्ष निवडीसाठी आज बैठक होणार होती. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ही बैठक रद्द करण्यात आलीये.. कार्याध्यक्ष निवडीवरून काल दोन गटात राडा झाला होता... त्यामुळे सध्या तणावाची परिस्थिती असल्याने आजची बैठक रद्द करण्यात आली... अधिकृत विश्वस्त निवडीचं पत्र दुपारी धर्मादाय आयुक्तांकडे दिलं जाणार आहे.. दरम्यान काल झालेल्या वादानंतर मंदिर परिसरात सुरक्षारक्षकांसह खासगी बाउन्सरही तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळालंय..