Kolhapur APMC Election : मतपेटीतून परत केले पैसे, चिठ्ठीतून मतदारांना उमेदवारांचे कानही टोचले
Kolhapur APMC Election : मतपेटीतून परत केले पैसे, चिठ्ठीतून मतदारांना उमेदवारांचे कानही टोचले
कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीत एक अनोखा प्रकार समोर आलाय. एका मतदाराने मतपेटीत एक हजार रुपयांचं पाकीट टाकल्याचं समोर आलंय.. स्वाभिमान जागा झालेल्या मतदाराने पैसे परत करत ते पैसे निवडणूक आयोगाकडे देण्याची विनंती केलीये. तसेच मतपेटीत चिठ्ठ्या टाकून शेतकऱ्यांनी नेत्यांचे कान टोचलेत. चिठ्ठ्यांमध्ये गुवाहाटीपासून ते ईडी कारवाईपर्यत सगळया गोष्टींचा उल्लेख करत सल्ले दिलेत. तर चंद्रकांत पाटलांनाही गट वाढवण्यापेक्षा पक्ष वाढवण्याचा सल्ला देण्यात आलाय.