Kolhapur मध्ये अंबाबाईची नगरप्रदक्षिणा संपन्न,देवी शहरवासियांना भेटीला : ABP Majha
अंबामाता की जयच्या गजरात करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा पार पडली.नवरात्रात अष्टमीच्या दिवशी देवी शहरवासीयांच्या भेटीला बाहेर पडते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या नागरप्रदक्षिणा सोहळ्यासाठी भाविकांनी सालाबादप्रमाणे मोठी गर्दी केली होती.. भालदार, चोपदार, रोषणनाईक असा शाही लवाजमा, फुलांनी सजलेले चांदीचे वाहन आणि त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती, अशा मंगलमय वातावरणात रात्री कोल्हापूर च्या अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा झाली.तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून आंबाबई देवीचे वाहन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले.महाद्वारातून वाहन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आले. या ठिकाणी श्री अंबाबाई आणि तुळजाभवानीची भेट झाली. त्यानंतर छत्रपती घराण्याने आरती केली. तेथून वाहन गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले. बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारात आले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली.गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे फक्त मानकऱ्याच्या उपस्थितीत हा नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडला होता... यावेळी मात्र या सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली