Keshavrao Bhosale Theatre : केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात, कलाकार भावूक
जयदीप मेढे
Updated at:
09 Aug 2024 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKeshavrao Bhosle Theatre : केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात, कलाकार भावूक
राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा काल रात्री आगीत उध्वस्त झाला.... संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाले..काल रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास या ऐतिहासिक वास्तूला आग लागली... ही आग इतकी प्रचंड होती की बघता बघता संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले... धक्कादायक म्हणजे आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे...आणि त्यांच्याच जयंतीच्या पूर्वसंध्येला केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडले... अग्निशनम दलाच्या मदतीने 3 तासांनी आग आटोक्यात आली... मात्र तोपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाचा कोळसा झाला...