K. Chandrashekar Rao पुन्हा Maharashtra दौऱ्यावर, केसीआर कोल्हापुरात दाखल होणार : ABP Majha
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचतील त्यानंतर बाय रोड वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी दुपारी के चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर के चंद्रशेखर राव कोल्हापूरमधील अंबाबाईच्या दर्शनासाठी जातील आणि तिथून परत हैदराबादला निघतील.