Kolhapur : Ambabai Temple : कोल्हापुरात पुरातत्व विभागाची टीम अंबाबाई मंदिरात दाखल
Continues below advertisement
साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचं शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची आज पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली...
साधारण अर्धा तास दोन्ही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.. दरम्यान यासंदर्भातला अहवाल पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दिला जाणार आहे...तसंच पाहणी अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागाला देखील पाठवला जाणार आहे... अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकरांनी केला होता.. अंबाबाईच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धन केल्यानं मूर्तीचं रूप बदलल्याचा आरोप त्यांनी केला होता.
Continues below advertisement