Gokul Sabha : कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने
Continues below advertisement
Gokul Sabha : कोल्हापूरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. विरोधी गटाचे सदस्य पोहोचण्याआधीच सभागृह हाऊसफुल झाल्यानं विरोधकांना मागच्या खुर्चांवर बसण्याची वेळ आलीय. गोकुळचे सत्ताधारी संचालक सतेज पाटील, हसन मुश्रीफ दाखल झालेत. तर विरोधी गटाच्या संचालक शौमिका महाडिक सभास्थानी आल्यात. दोन्ही बाजूनं घोषणाबाजी चालू असल्यानं पोलीस सदस्यांची समजूत काढत आहेत. शौमिका महाडिक यांनी साध्या दूध उत्पादकांची फसवणूक करु नका असं आवाहन करत सत्ताधाऱ्यांनी दिलेली वचनं पाळली नाहीत असा आरोप केला. तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही पलटवार केला.
Continues below advertisement
Tags :
Gokul Live Marathi News ABP Majha LIVE Gokul Sabha Abp Maza Live Kolhapur Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Maharashtra Politics ABP Maza MARATHI NEWS