KOLHAPUR : गवा नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी निघाला :ABP MAJHA
कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट परिसरात ठाण मांडून बसलेला गवा अखेर त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी बाहेर पडलाय. गव्याला नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी पोलीस, वन विभाग त्याचबरोबर इतर संबंधित यंत्रणा प्रयत्न करत होत्या. मात्र हा गवा दमला असल्यामुळे सकाळपासून एकाच ठिकाणी बसून होता. अखेर संध्याळी गव्यानं आपली जागा सोडली.. त्याच्या परतीच्या प्रवासात कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये यासाठी पोलीस आणि वन विभागाकडून खबरदारी घेण्यात आली.