Chhatrapati Sambhaji Raje:ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे भेटू,छत्रपती संभाजीराजेचं ट्वीट;मोठी घोषणा होणार?

रोजी सकाळी ट्विट करून छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा केली आहे. 9 ऑगस्ट रोजी असणाऱ्या क्रांती दिना दिवशी तुळजापूर येथे भेटू, असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असून या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola