Asim Sarode On Koratkar Case : प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकील असीम सरोदे आणि इंद्रजीत सावंत काय म्हणाले?

Continues below advertisement

Asim Sarode On Koratkar Case : प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकील असीम सरोदे आणि इंद्रजीत सावंत काय म्हणाले?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला (Prashant Koratkar) आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यापूर्वी न्यायालयाने(Court) कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे, आता 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे. कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी-कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती. तर, कोरटकर घरात एकटा कमावता आहे, त्याला एक मुलगी आहे अशी बाजू कोरटकरच्या वकिलांनी मांडली. दरम्यान, यावेळी, असीम सरोदे आणि वकील सौरभ घाग यांच्यात तू तू मै मै झाल्याचं दिसून आलं.  

प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola