Kolhapur : 93 बॉम्बस्फोटातील आरोपीला जेलमध्ये संपवलं, डोक्यात घातलं ड्रेनचं झाकण ABP MAJHA

कोल्हापूर : मुंबईमधील 1993 च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कळंबा कारागृहात निर्घृण खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचे नाव आहे. आज (2 जून) सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता निर्घृण खून करण्यात आला. न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेज वरील लोखंडी झाकनाने मुन्नाला मारहाण केली होती. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला.

खूनाच्या प्रकरणारने कुख्यात होत चाललेल्या कळंबा जेलमध्ये (Kalamba Jail) खुनाची मालिका सुरुच आहे. त्यामुळे कळंबा जेलमधील बेशिस्त पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. गांजा सापडणे, पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीगभर मोबाईल सापडत असल्याने कळंबा जेल पुरते बदनाम झाले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola