Kokan : आंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी आज आझाद मैदानावर आंदोलन : ABP Majha
आंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी आज आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.. कोकणातील हजार ते बाराशे शेतकरी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात दाखल होणार आहेत.. आंबा बागायतदारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत घरांवर काळे झेंडे लावत सरकारचा निषेध करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.. मागील पाच ते सहा वर्षांपासून कोकणातील हवामान बदलाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय.. यामुळे आंबा उत्पादक अडचणीत सापडले आहेत..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Kokan Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र कोकण ताज्या बातम्या Mango आंबा ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv कोकण आंबा