Kishori Pednekar PC on Threat Letter : पत्रातील भाषेमुळे महापौर किशोरी पेडणेकरांच्या डोळ्यात पाणी
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. याबाबत किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यातून अश्रू आले. बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रात हीन दर्जेच्या भाषेचा वापर करण्यात आलाय. कुटंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. माझ्या कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही. पत्रात अवयवाची विंटबना कऱण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी मला धमकीचे पत्र मिळाले. गेले ४० वर्ष आम्ही आमचं चारित्र्य जपलं. पत्रातील भाषा अत्यंत अश्लिल आहे. मी ते पत्र वाचुही शकले नाही. स्त्रियांच्या ज्या भागाचा उल्लेख करु नये अश्या भागांचा उल्लेख या केला जातोय. मारुन टाकू, विटंबना करु असे पत्रात म्हटलेय.
Tags :
Mumbai मुंबई पत्र Mayor महापौर Kishori Pednekar किशोरी पेडणेकर महापौर मुंबई पत्र Letters Character