नाशिकमधून निघालेला किसान मोर्चा ठाण्यात दाखल, कोपरी पुलावरून मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार मोर्चा
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे.
Tags :
Kopri Rajbhavan Agriculture Azad Maidan Bhiwandi Thane Agriculture Bill Farmer Bill Kisan Morcha