Electricity Bill | लोकांची दिशाभूल करून राज्य सरकारकडू लूट,पगारासाठी पैसे नसल्यानं कारस्थान- सोमय्या
महावितरणच्या वाढीव बिलांच्या संदर्भात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून ऊर्जा मंत्री नितीन राऊत राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. बोगस बिलं आली तर भरू नका आम्हाला तक्रार करा, मात्र तरीही वीज कापली तर महावितरणवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महावितरणच्या धोरणांवर आणि ऊर्जामंत्र्यांवर टीका केली आहे.
Tags :
Mumbai Light Bill Mumbai Electricity Bill Nitin Raut Light Bill Electricity Bill Kirit Somaiyya Bill BJP