वीजबिलाच्या नावावर ठाकरे सरकारने फक्त लुटलं, त्याविरोधात आमचा निषेध - किरीट सोमय्या
मुंबई: कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन सुरु केलंय. राज्यात जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि महत्वाच्या शहरांत भाजपने आंदोलन सुरु केलंय. महाविकास आघाडीविरोधात घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं आहे.
लॉकडाऊन काळात महाआघाडी सरकारने नागरिकांना वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता राज्य सरकारला त्याचा विसर पडल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता त्या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Tags :
Mumbai Light Bill Mumbai Electricity Bill BJP Protest Nitin Raut Light Bill Electricity Bill Kirit Somaiyya Bill State Government Maharashtra Government