Kerala Plane Crash | केरळच्या कोझीकोडमध्ये रनवेवरून घसरत विमान दरीत कोसळलं, विमानाचे दोन तुकडे
केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रनवेहून पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.
Tags :
Kozikode Plane Crash Kozikode Airplane Crash Plane Crash Air India Plane Crash Kerala Plane Crash Kerala