क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी:मुख्यमंत्री Thackeray
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काही समाजकंटक लोकांनी विटंबना केली होती. याप्रकरणी महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालावे अन् दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शिवराय सगळ्या देशाचे दैवत आहे. हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा. आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Prime Minister पंतप्रधान मुख्यमंत्री ताज्या बातम्या Chief Minister Thackeray Kannada ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News