#KanganaRanaut on #AadityaThackeray सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग तस्कर आदित्यचे साथीदार, कंगनाचे ट्वीटद्वारे गंभीर आरोप

Continues below advertisement

कंगना अखेर चार दिवसांच्या आपल्या मुंबई दौऱ्यानंतर पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. पण तिकडे गेल्यानंतर आता ती आणखी भडक विधानं करू लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता कंगनाने थेट आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये तिने पहिल्यांदाच ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे.

कगंनाने सोमवारी 5 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करत असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणते, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या अशी की मी मुव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी ठाकरे यांचे लाडके चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात. हा माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्यामागे ते आहेत. पण ठिके. आता बघू कोण कुणाचा बंदोबस्त करतो.'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram