HC Relief to Kangana & Rangoli | कंगना रनौत आणि रंगोली चंदेलला हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा

Continues below advertisement

मुंबई : सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अपमानकारक पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. जर आम्ही त्यांना दिलासाच दिला नाही तर राज्याबाहेरून त्या इथं येतीलच कशा? त्यामुळे पुढील चौकशीसाठी त्यांना दिलासा देत आहोत असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी तूर्तास अटक करू नका असे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करावा अशी मागणी करत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram