JEE Advance 2021 परीक्षा 3 जुलैला, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा, 75% ची अटही शिथील
Continues below advertisement
JEE Advanced 2021 Date Announced: जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा 3 जुलैला होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे. जेईई मेन्सच्या वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता जेईई अॅडव्हान्स परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता होती. 75 टक्केची पद्धत यावर्षी हटवली आहे, विद्यार्थ्यांना दिलासा यामुळे मिळणार आहे.
आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली. देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
JEE Advance 2021 Student Exam JEE 2021 JEE Exam Ramesh Pokhriyal Jee NEET Exam Neet National News