Jaydeep Thackeray Exclusive : मी उद्धव काकांसाहेबतच, उद्धव ठाकरे यांचा पुतण्या काय म्हणतो?
Jaydeep Thackeray Exclusive : दसरा मेळाव्याला बीकेसीत शिंदेंच्या मंचावर उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे दिसले....पण जयदेव ठाकरे यांचे सुपूत्र जयदीप ठाकरे हे मात्र उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात दिसले... जयदीप ठाकरे हे काका उद्धव ठाकरेंच्या मंचावर दिसले... शिंदेंची साथ सोडू नका असं आवाहन जयदीप ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरेंचे बंधू यांनी बीकेसीतल्या मेळाव्यात केलं.. पण जयदीप ठाकरेंनी मात्र उद्धव ठाकरेंना साथ देणं पसंत केलं.... उद्धव काकांनी राजकीय जबाबदारी दिल्यास राजकारणात सुद्धा सक्रिय होणार असं जयदीप ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हंटलंय...