Jayakwadi Dam | सलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरण संपूर्ण भरलं! हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला दिलासा
सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबादचं जायकवाडी धरण संपूर्ण भरलं आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या एक हजार क्युसेकने गोदावरी नदीत हा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण भरल्यानं शेतकऱ्यांच्या आणि उद्योगधंद्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला यामुळे दिलासा मिळाला आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं असं मातीचं हे धरण आहे.
Tags :
Hongoli Aurangabad Dam Water Storage Farmer Issue Paithan Jayakwadi Dam Nanded Water Issue Aurangabad