Plasma Donation | जनकल्याण रक्तपेढीचा प्लाझ्मादानासाठी पुढाकार, प्लाझ्मा दान करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
थैमान मांडलेल्या कोरोनापासून रुग्णांना वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी अनेकदा उपयोगी ठरते. परंतु अनेक गैरसमजांमुळे कोरोनातून बरे झालेले लोक प्लाझा दान करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना प्लाझा दान करण्याचं महत्व पटल्याने ते प्रत्येक पंधरा दिवसांच्या अंतराने प्लाझ्मा दान करतायत. पुण्यातील जनकल्याण रक्त पेढीने त्यासाठी पुढाकार घेतलाय. प्लाझ्मा दान करणाऱ्यांचे हे अनुभव ऐकल्यानंतर तरी कोरोनातून बरे झालेले लोक पुढं येतील ही अपेक्षा आहे.
Continues below advertisement