Jalna मध्ये समर्थ रामदासांचे देव चोरीला, चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी : ABP Majha
देवा तुला शोधू कुठे असं म्हणायची वेळ सध्या जालन्यातील जांब-समर्थमधील ग्रामस्थांवर आलीय.... स्वतः समर्थ रामदास ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच प्राचीन मूर्ती काल पहाटे चोरीला गेल्या.. मात्र २४ तास उलटून गेलेत आणि अजूनही ना चोरांचा ठावठिकाणा... ना मूर्तींचा पत्ता.... मूर्ती चोरीला गेल्यानं पहिल्यांदाच श्रीराम मंदिरात सकाळी सात वाजता होणारी आरती झाली नाही. मंदिरात देवच नसतील तर कशाची आरती करायची असा संतप्त प्रश्न भाविक आणि ग्रामस्थ विचारतायत..... मूर्ती चोरीला गेल्यानं आपल्याच घरातलं कुणी तरी गेलंय अशी भावना ग्रामस्थांची झालीय... मूर्ती चोरांना लवकरात लवकर गजाआड करा अशी मागणी जांब समर्थच्या ग्रामस्थांकडून करण्यात येतेय.... मूर्ती चोरीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग करण्याचा इशारा दिलाय... राम मंदिरातून राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत..समर्थ रामदास स्वतःत्या झोळीत जी मूर्ती ठेवायचे ती देखील चोरीला गेलीय. त्यामुळे या चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय...