Manoj Jarange Special Report : आंतरवाली सराटीतूनच जरांगेंचं चौथ्यांदा उपोषण

Continues below advertisement

Manoj Jarange Special Report : आंतरवाली सराटीतूनच जरांगेंचं चौथ्यांदा उपोषण लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम संपली...आणि राज्यात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण तापू लागलंय...मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय...राहिलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राजकीय किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांना जरांगेंनी खडे बोल सुनावले. २०१५ साली आपल्या सरकारनं मराठा आरक्षण दिलं, तरीही आपल्या विरोधात खोटं नॅरेटिव्ह पसरवलं असं फडणवीस आज म्हणाले. त्यावर जरांगेंनी यांनी प्रत्युत्तर दिलं. तुम्ही आरक्षण दिलं म्हणूनच भाजपचे १०६ आमदार मराठ्यांनी निव़डून दिलं, आताच्या आरक्षणाचं बोला असं जरांगे म्हणाले.  ..आता जरांगेंचं हे उपोषण सरकार कसं हाताळणार हा प्रश्न आहे, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram