Manoj Jarange on Kunbi Record : ...तर 40व्या दिवशी सरकारला सोडणार नाही! मनोज जरांगेंचा इशारा
राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसाची मुदत संपल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मराठा आरक्षणासाठी ५ हजार कुणबी नोंदी पुरेशा आहेत, त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगेंनी केलीय. १४ ऑक्टोबरला राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतील ३० दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर मराठा समाजाकडून संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.