Manoj Jarange Jalna Sabha : जालन्यात जरांगेंची सभा, स्वागतासाठी फुलांनी भरलेल्या 140 जेसीबी
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. १ डिसेंबर ते १२डिसेंबर असा त्यांचा दौरा असेल. त्याआधी जरांगेच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच जालन्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी १ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आलंय. नवीन मोंढा परिसरात ४० एकर मैदानावर ही भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. जरांगेंच्या सभेआधी जालना शहरात त्यांच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेल्या १४० जेसीबी तयार ठेवल्या आहेत. याशिवाय व्यासपीठावर १०० फुटांचा भव्य पुष्पहार देखील क्रेनच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरु मनोज जरांगे आज काय बोलणार हे पाहावं लागेल. सभेनंतर जरांगेंचा मुक्काम अंतरवाली सराटीतच असेल. जरांगेंच्या सभेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी
Continues below advertisement